मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

पत्रव्यवहार / शासकीय पत्रे

शासनाकडे केलेला लेखी पाठपुरावा

शाळा व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथे एकदिवसीय धरणे आंदोलन

शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करावे आणि अंशतः अनुदानित शाळांचे वाढीव टप्प्याचे थकीत वेतन द्यावे, यासाठी ३१ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलनाबाबत आयुक्त (शिक्षण) व शिक्षण संचालकांना निवेदन.

अधिक वाचा

पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर पदोन्नतीची एकदाच विशेष संधी द्यावी

१००% अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील B.Ed./D.Ed. पात्रताधारक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर पदोन्नतीसाठी One Time Relaxation देण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन.

अधिक वाचा

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांना याच वर्षी प्रशिक्षण द्यावे

नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र होणाऱ्या शिक्षकांना याच वर्षी प्रशिक्षणाची संधी देण्याबाबत प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त व SCERT संचालकांना निवेदन.

अधिक वाचा

शालेय पोषण आहार विभाग स्वतंत्र यंत्रणेकडून चालवावा

शाळांवरील अतिरिक्त कामांच्या भारामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने पोषण आहार विभाग स्वतंत्रपणे दुसऱ्या यंत्रणेकडून नियंत्रित करावा, यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन.

अधिक वाचा

शाळांतील अन्न सुरक्षा विनियम २०२० च्या अंमलबजावणीबाबत अन्न व औषध प्रशासनाला निवेदन

सर्व शाळांमध्ये सुरक्षित, पौष्टिक व संतुलित अन्न सुनिश्चित करण्यासाठीच्या अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०२० च्या अंमलबजावणीबाबत आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना निवेदन.

अधिक वाचा

पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करून उमेदवारांना मुदतवाढ द्यावी

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून अर्ज भरण्यास व प्राधान्यक्रम नोंदविण्यास पुरेशी मुदतवाढ देण्याबाबत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

अधिक वाचा

शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाचे पत्र

शाळांना अनुदान, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना पुढील टप्पा आणि विनाअनुदानित शाळांचे मूल्यांकन या विषयांवर मा. मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक आयोजित करण्याबाबत प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांना पत्र.

अधिक वाचा

पात्र शाळांना वेतन अदा करण्याबाबत शासनाचे पत्र

शासन निर्णय दि. ६/२/२०२३ नुसार पात्र ठरणाऱ्या शाळांना वेतन अदा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे आयुक्त (शिक्षण), पुणे यांना पत्र.

अधिक वाचा

मुंबई भेटीदरम्यान आमदार निवासात निवास व्यवस्थेबाबत पत्र

आ. विक्रम वसंतराव काळे यांनी श्री. खंडेराव जगदाळे व सहकाऱ्यांना आकाशवाणी आमदार निवास, मुंबई येथील कक्ष क्र. २०१ मध्ये प्रवेश देण्याबाबत दिलेले पत्र.

अधिक वाचा

सातव्या वेतन आयोगानुसार तरतुदीची मागणी

विधान परिषद सदस्य आ. नागो पुंडलिक गाणार यांचे पत्र: सहाव्या वेतन आयोगाऐवजी सातव्या वेतन आयोगानुसार अपेक्षित खर्चाच्या तरतुदींचा पुरवणी मागणीत समावेश करून मंजुरी द्यावी.

अधिक वाचा