
सर्व शाळांमध्ये सुरक्षित, पौष्टिक व संतुलित अन्न सुनिश्चित करण्यासाठीच्या अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०२० च्या अंमलबजावणीबाबत आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना निवेदन.
अन्न व औषध प्रशासनाच्या दि. २८/०७/२०२६ च्या पत्राच्या संदर्भात हे निवेदन देण्यात आले. शालेय बालकांना सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित अन्न मिळणे हे सर्वांचे प्राथमिक कर्तव्य असून संघटना या विनियमाचे स्वागत करते.
मात्र शाळा व शिक्षक केवळ शिजवण्याचे व वाटपाचे काम करतात; धान्य, तेल, मीठ, तांदूळ असे साहित्य ठेकेदारांमार्फत पुरवले जाते. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या पुरवठ्याची जबाबदारी शिक्षकांवर न टाकता पुरवठादार ठेकेदारांची तपासणी करावी आणि दर्जेदार साहित्य शाळांना मिळेल याची काळजी घ्यावी, अशी मागणी आहे.