मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाचे पत्र

३१ जानेवारी २०२४

शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाचे पत्र

शाळांना अनुदान, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना पुढील टप्पा आणि विनाअनुदानित शाळांचे मूल्यांकन या विषयांवर मा. मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक आयोजित करण्याबाबत प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांना पत्र.

मुख्यमंत्री सचिवालय (मुलाखत कक्ष) यांनी दि. ३१.०१.२०२४ रोजी प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय यांना पाठवलेल्या या पत्रात पुढील विषयांवर मा. मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक आयोजित करण्याबाबत कळवले आहे:

१) सन २०२३-२४ या वर्षाची शेवटच्या वर्गाची पटसंख्या गृहीत धरून शाळांना अनुदान देणे. २) २०२१ मध्ये ३० दिवसांची मुदत देऊन त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देणे. ३) पुणे स्तरावरील त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान घोषित करणे. ४) दि. ०१.०१.२०२४ पासून टप्पा अनुदान प्राप्त शाळांना पुढील टप्पा देणे. ५) क्षेत्रीय स्तरावरील विनाअनुदानित शाळांना अनुदानावर आणण्यासाठी २०२३-२४ हे वर्ष सर्व निकषांसाठी गृहीत धरून मूल्यांकन करून अनुदान देणे.

शेअर करा: