
नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र होणाऱ्या शिक्षकांना याच वर्षी प्रशिक्षणाची संधी देण्याबाबत प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त व SCERT संचालकांना निवेदन.
जनगणना व इतर शासकीय कामांमुळे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले असून ते दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन असल्याचे समजते. १ एप्रिल २०२७ पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याने पुढील वर्षीही प्रशिक्षण होणे अवघड आहे.
त्यामुळे नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत १२ वर्षांची सेवा पूर्ण करणारे (वरिष्ठ श्रेणी) आणि २४ वर्षांची सेवा पूर्ण करणारे (निवड श्रेणी) शिक्षक याच वर्षीच्या प्रशिक्षणात सहभागी करून घ्यावेत, त्यांच्या नाव नोंदणीसाठी विशेष संधी द्यावी आणि कोणताही शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहू नये, अशी विनंती आहे.