जाहीरनामा
शिक्षकांसाठी २१ मुद्दे · श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर
जुनी पेन्शन, १००% अनुदान, सेवा संरक्षण आणि अशैक्षणिक कामांतून मुक्ती: शिक्षकांसाठी आमची वचनबद्धता.
आर्थिक न्याय आणि पेन्शन हक्क
- १सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
- २शाळांना मिळणारे वेतन व अनुदान महागाई निर्देशांकानुसार (Cost of Living Index) वाढवणे.
- ३विनाअनुदानित शाळा चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांना इमारत भाड्याच्या मदतीसाठी पाठपुरावा करणे.
- ४अंशत: अनुदानित शाळा व तुकड्यांना कायद्याने मिळणारे सेवा संरक्षण आणि वाढीव सुविधा मिळवून देणे.
- ५अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापकीय अभ्यासक्रम, रात्रशाळा, कनिष्ठ महाविद्यालये, MCVC आणि ITI मधील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे.
- ६'समान काम - समान दाम' या तत्त्वानुसार सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय्य व सन्मानजनक वेतन देणे.
सेवा संरक्षण आणि प्रशासकीय सुधारणा
- ७शिक्षकांचे वैद्यकीय बिल पूर्णपणे 'कॅशलेस' करणे आणि फाईल मंजुरीची प्रक्रिया ऑनलाईन करून थेट अधीक्षक शिक्षण उपसंचालकांकडे सोपवणे.
- ८सर्व विनाअनुदानित शाळांना तसेच तुकड्यांना १००% अनुदान मिळवून देणे.
- ९संच मान्यतेतील सर्व जाचक अटी कायमच्या रद्द करणे.
- १०विद्यार्थी पटसंख्या हिशोब बदलून आदिवासी/सीमाभागासाठी १५, ग्रामीणसाठी २० व शहरीसाठी २५ निश्चित करणे (मराठी शाळा संवर्धनासाठी).
- ११RTE प्रमाणपत्र दरवर्षी नूतनीकरणाचा जाचक नियम बंद करून ते थेट १० वर्षांसाठी वैध करणे.
- १२शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे स्वायत्त अधिकार पुन्हा संस्थांकडे देणे.
- १३शाळांमधील सर्व पायाभूत पदांना पूर्ण संरक्षण मिळवून देणे.
- १४शिक्षकांची वार्षिक वेतनवाढ (Increment) ऑनलाईन प्रणालीत ऑटो-अपडेट होणे.
- १५शाळा आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांना समाजकंटकांकडून होणाऱ्या नाहक त्रासापासून कायदेशीर संरक्षण पुरवणे.
शैक्षणिक दर्जा आणि कार्यमुक्ती
- १६'सरल पोर्टल' च्या त्रासातून मुक्ती आणि वारंवार सर्व्हर डाऊन होण्याचा जाच कायमचा बंद करणे.
- १७शिक्षकांवर लादली जाणारी अशैक्षणिक आणि जाचक ऑनलाईन कामे संपूर्णपणे बंद करणे.
- १८शासनाचे अनावश्यक उपक्रम कमी करून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या 'फक्त शिकवण्यावर' लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ देणे.
- १९'मागेल तिथे शाळा व तुकड्या' देण्याच्या धोरणामुळे धोक्यात आलेल्या जुन्या शाळांच्या अस्तित्वावर योग्य उपाययोजना करणे.
- २०खरोखर गरज असलेल्या ठिकाणीच वस्तुस्थितीचा अभ्यास करून अनुदान तत्त्वावर नवीन शाळांना मान्यता देणे.
- २१मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करणे.
सेवा आमची, हक्क आमचा!
नियुक्ती जुनी, सेवा जुनी; मग पेन्शनही जुनीच हवी!
शिक्षक म्हणजे केवळ नोकरी करणारा कर्मचारी नव्हे, तर भावी पिढी घडविणारा राष्ट्रनिर्माता आहे. आयुष्यभर समाजासाठी समर्पित केलेल्या शिक्षकांच्या निवृत्तीनंतरच्या सुरक्षिततेचा विचार करणे ही सरकारची व समाजाची समान जबाबदारी आहे.
आमचा सरळ आणि न्याय्य प्रश्न
- अनुदानाचा टप्पा उशिरा मिळाला म्हणून नियुक्तीची तारीख बदलते का?
- सेवा सुरू झाल्याची तारीख बदलते का?
- विद्यार्थ्यांना दिलेली वर्षे कमी होतात का?
आमच्या मागण्या
- १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
- वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरलेली सेवा पेन्शनसाठीही ग्राह्य धरण्यात यावी.
- न्याय, समानता आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार निर्णय घ्यावा.
- शिक्षकांच्या वृद्धापकाळातील स्वाभिमानाची हमी द्यावी.
जुनी पेन्शन योजना म्हणजे
- आर्थिक सुरक्षितता
- स्वाभिमानाचे जीवन
- कुटुंबावर आर्थिक भार नाही
- सामाजिक सन्मान
- नियमित व हमी असलेला आर्थिक आधार
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी श्री खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे या नावासमोरील चौकटीत पसंतीक्रम १ लिहून आपलं अमूल्य मत द्या आणि सरांना प्रचंड बहुमतानं विजयी करा.
मतदार यादीत नाव शोधा