मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर पदोन्नतीची एकदाच विशेष संधी द्यावी

जावक क्र. १४१/२०२६, दि. २१/०८/२०२६

पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर पदोन्नतीची एकदाच विशेष संधी द्यावी

१००% अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील B.Ed./D.Ed. पात्रताधारक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर पदोन्नतीसाठी One Time Relaxation देण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन.

हे निवेदन मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. शालेय शिक्षण मंत्री, मा. शालेय शिक्षण राज्यमंत्री, मा. मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) आणि मा. शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले.

पवित्र पोर्टलमुळे भरती प्रक्रिया पारदर्शक झाली याचे स्वागत करतानाच, अनेक वर्षे सेवा करून B.Ed./D.Ed. पात्रता मिळवलेले शिक्षकेतर कर्मचारी बदललेल्या धोरणामुळे शिक्षक पदापासून वंचित राहत असल्याकडे लक्ष वेधले आहे.

३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना, संस्थेत रिक्त शिक्षक पद उपलब्ध असल्यास, एकदाच विशेष सवलत देऊन पदोन्नती द्यावी आणि त्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढावा, अशी मागणी आहे.

शेअर करा: