श्री. खंडेराव शकुंतला शिवाजीराव जगदाळे सर
मुख्याध्यापक · उपाध्यक्ष, विनाअनुदानित शाळा कृती समिती · पुणे विभाग शिक्षक मतदार संघ
शिक्षकांच्या लढ्याचा संघर्षयोद्धा!
श्री. खंडेराव जगदाळे सर हे गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील लढाई लढणारे धडाडीचे नेतृत्व आहेत. 'न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर (शिरोळ)' येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतानाच, त्यांनी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील शाळांना एकत्र करून ७० हजार शिक्षक व मुख्याध्यापकांची वज्रमूठ निर्माण केली.
शिक्षकांच्या हक्कांसाठी त्यांनी ७ वेळा राजकीय तुरुंगवास पत्करला असून अमानुष लाठीहल्लेही सोसले आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन हे शिक्षक हितासाठी समर्पित असून संघर्षाच्या काळात त्यांनी असीम कौटुंबिक त्याग केला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये माता आणि पित्याचे छत्र अवघ्या काही दिवसांच्या अंतराने हरवले असताना, एका बाजूला वडिलांचे पार्थिव समोर असतानाही त्यांनी वैयक्तिक दुःख बाजूला सारून कोल्हापूरच्या विशाल शिक्षक मोर्चाचे नेतृत्व केले.
त्यांच्या याच त्यागाची आणि संघर्षाची पावती म्हणून त्यांना 'प्रेरणा पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे. आता ते पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेत शिक्षकांचा अधिकृत आवाज बनण्यासाठी सज्ज झाले आहेत.
०
वर्षांचा प्रवास
०+
आंदोलने
०+
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी
०
वेळा राजकीय तुरुंगवास
०
वर्षांपासून अनवाणी
पदे व जबाबदाऱ्या
- मुख्याध्यापक: न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर (शिरोळ)
- उपाध्यक्ष: विनाअनुदानित शाळा कृती समिती, महाराष्ट्र राज्य
सन्मान
- प्रेरणा पुरस्कार
प्रवास
२०००
'कायम विनाअनुदानित' हा जाचक शब्द वगळण्यासाठी राज्यभरातील शाळा एकत्र करून ७० हजार मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांची वज्रमूठ निर्माण केली.
जून २००८
मुंबईच्या आझाद मैदानावर १ ते १६ जून २००८ असे सलग १६ दिवस ऐतिहासिक आंदोलन केले. पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्यात अटक सोसली, ज्याने 'कायम' शब्द निघण्याचा मार्ग मोकळा केला.
२०११ - २०१२
शाळांचे अधिकृत मूल्यांकन सुरू झाले आणि शेकडो शाळांना पात्र करून घेण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
ऑक्टोबर २०१५
मिरज येथे रेल्वेची चाके रोखून धरत ऐतिहासिक 'रेल रोको' आंदोलन गाजवले.
डिसेंबर २०१५
नागपूर हिवाळी अधिवेशनावर १५ ते २० हजार विनाअनुदानित शिक्षकांना सोबत घेऊन तीव्र थंडीत ऐतिहासिक पायी दिंडी काढली. परिणामी सरकारने २०% अनुदानाची घोषणा केली.
जून २०१६
१ ते १५ जून २०१६ दरम्यान विभागीय आंदोलने केली. परिणामी ९६२८ शाळांना पहिल्यांदा २०% अनुदान सुरू झाले.
सप्टेंबर २०१६
आई-वडिलांचे छत्र हरवले असतानाही वैयक्तिक दुःख बाजूला सारून कोल्हापूरच्या विशाल शिक्षक मोर्चाचे नेतृत्व केले.
जुलै २०२४
८ व ९ जुलै २०२४ रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून मुंबईच्या आझाद मैदानावर ३५ हजार शिक्षकांच्या भव्य आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले.
२०२६
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी उमेदवारी.
आमची मूल्ये
शिक्षकांसाठीच्या कामाची दिशा ठरवणारी तत्त्वे.
- १गुणवत्तापूर्ण शिक्षण
- २प्रामाणिक निर्धार
- ३सदैव सोबत
- ४आवाज शिक्षकांचा
- ५संवाद आणि सहकार्य
- ६शिक्षक सन्मान
- ७नीतीमूलक कार्यप्रणाली
- ८पारदर्शक व्यवस्था
- ९शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने
- १०सर्वांगीण शिक्षक कल्याण
- ११शिक्षकांसाठी सशक्त व्यासपीठ