मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करून उमेदवारांना मुदतवाढ द्यावी

जावक क्र. १३७/२०२६, दि. १०/०८/२०२६

पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करून उमेदवारांना मुदतवाढ द्यावी

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून अर्ज भरण्यास व प्राधान्यक्रम नोंदविण्यास पुरेशी मुदतवाढ देण्याबाबत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

पवित्र पोर्टलवर अर्ज भरताना सर्व्हर डाऊन होणे, OTP न येणे, Preferences Generate न होणे आणि लॉगिन न होणे अशा अनेक तांत्रिक अडचणी उमेदवारांना येत असल्याकडे या निवेदनात लक्ष वेधले आहे.

सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून पोर्टल सुरळीत चालू करावे, स्वतंत्र तांत्रिक मदत यंत्रणा व हेल्पलाइन सुरू करावी, अर्ज व प्राधान्यक्रम नोंदणीसाठी किमान १० दिवसांची मुदतवाढ द्यावी आणि तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहिलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

शेअर करा: