
राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून मुंबईच्या आझाद मैदानावर ३५ हजार शिक्षकांच्या भव्य ऐतिहासिक आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले.
विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या १००% अनुदानाच्या व इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील आझाद मैदानावर ३५,००० शिक्षकांचा महासागर लोटला होता. या भव्य आणि ऐतिहासिक आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व खंडेराव जगदाळे सरांनी केले.