
१५ ते २० हजार शिक्षकांना सोबत घेऊन तीव्र थंडीत १७० किमीची ५ दिवसांची ऐतिहासिक पायी दिंडी काढली. परिणामी सरकारने २०% अनुदानाची घोषणा केली.
शिक्षकांना तात्काळ वेतन अनुदान मिळावे या मागणीसाठी जगदाळे सरांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० हजार विनाअनुदानित शिक्षकांनी तीव्र थंडीची पर्वा न करता ५ दिवसांत १७० किलोमीटरचे अंतर पायी पार केले. ही ऐतिहासिक दिंडी नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकली. या प्रचंड जनसमुदायापुढे झुकून सरकारने अखेर विनाअनुदानित शाळांसाठी पहिल्यांदा २०% अनुदानाची घोषणा केली.