
शाळा आणि तुकड्यांना लागलेला 'कायम' हा जाचक शब्द वगळण्यासाठी राज्यभरातील शाळा एकत्र करून ७० हजार शिक्षकांची वज्रमूठ निर्माण केली.
महाराष्ट्रातील हजारो शाळा आणि तुकड्यांना शासनाने 'कायम विनाअनुदानित' असा दर्जा देऊन शिक्षकांचे भविष्य अंधारात ढकलले होते. खंडेराव जगदाळे सरांनी या जाचक शब्दाविरुद्ध राज्यव्यापी लढा पुकारला. त्यांनी संपूर्ण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ७०,००० मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एका व्यासपीठावर आणून ऐतिहासिक वज्रमूठ निर्माण केली.