
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करत TET सह शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करून, ज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची वाट निर्माण करणाऱ्या थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" या विचारातून कर्मवीरांनी उभा केलेला शिक्षणाचा वसा आजही मार्गदर्शक आहे.
आजच्या शिक्षणव्यवस्थेतील TET सह शिक्षकांचे विविध प्रश्न, अतिरिक्त कामाचा भार आणि शिक्षकांसमोरील आव्हाने यांचाही शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कर्मवीरांचा विचार कृतीत उतरला, तरच त्यांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल!