मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

शिराळा तालुक्यातील ४२ शाळांना भेटी

१० ऑगस्ट, २०२६

शिराळा तालुक्यातील ४२ शाळांना भेटी

अभिजित आपटे यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तालुक्यातील ४२ शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अधिकृत उमेदवार श्री. खंडेराव शिवाजीराव जगदाळे यांच्या प्रचारार्थ अभिजित आपटे यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तालुक्यात विशेष शाळा भेट दौरा आयोजित करण्यात आला.

या दौऱ्यात तालुक्यातील ४२ शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. जुनी पेन्शन, १००% अनुदान, पवित्र पोर्टल भरती आणि अशैक्षणिक कामांचा ताण हे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले.

छायाचित्रे (10)

Instagram वर पहा शेअर करा: