
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करून कराड तालुका संपर्क व प्रचार दौऱ्याचा शुभारंभ झाला आणि शिक्षक बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून श्री. खंडेराव जगदाळे सर यांच्या कराड तालुका संपर्क व प्रचार दौऱ्याचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कराड तालुक्यातील शिक्षक बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विविध शैक्षणिक प्रश्न जाणून घेण्यात आले. शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.