मुख्य मजकुराकडे जा
जगदाळे सरपुणे विभाग शिक्षक मतदार संघ

जुन्या पेन्शनसाठी कोल्हापुरात हजारो शिक्षकांचा मूक मोर्चा

५ सप्टेंबर, २०२६

शिक्षक दिनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढून हजारो शिक्षकांनी जुन्या पेन्शनच्या न्याय्य हक्काची मागणी केली.

शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजनेच्या न्याय्य हक्कासाठी ५ सप्टेंबर रोजी कोल्हापूरच्या भूमीत हजारो शिक्षक बंधू-भगिनी एकजुटीने रस्त्यावर उतरले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मूक मोर्चा होता, पण शिक्षकांचा निर्धार स्पष्ट होता.

विशेषतः १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती झालेल्या, मात्र २००५ नंतर शाळा १००% अनुदानावर आल्यामुळे पेन्शनच्या प्रश्नाला सामोरे जाणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी हा लढा आहे. नियुक्ती जुनी, सेवा जुनी, मग पेन्शनही जुनीच हवी!

"आलेल्या सर्व शिक्षकांचे मनस्वी आभार. पण हा लढा इथंच थांबणार नाही... एकच मिशन, जुनी पेन्शन!"

Instagram वर पहा शेअर करा: